कसबेडिग्रजला महिलेचा गळा आवळून खून 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

तुंग : कसबे डिग्रज (तालुका मिरज) येथे साडेचारच्या सुमारास महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. जयश्री काशिनाथ पवार (वय 35) असे त्या महिलेच नाव आहे. त्यानंतर संशयित आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फिरोज उर्फ गोट्या दिलावर नरदेकर (वय 38) असे त्याचे नाव असून त्याला अत्यवस्थेत शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, फिरोजचे या महिलेच्या घरी सतत घरी येणे जाणे होते, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान खुनाचे कारण रात्री उशीरापर्यत स्पष्ट झाले नव्हते. 

अधिक माहिती अशी, कसबे डिग्रज येथील नाईकबा नगरमध्ये जयश्री पवार राहत होती. एक वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर ती, सासु व दोन मुली, एक मुलगा असे राहत होते. यादरम्यान घरासमोरील फिरोज उर्फ गोटया दिलावर नरदेकर यांच्याशी संपर्क वाढला होता. तो सारखा तिच्याकडे पैसे मागत असे. आज (सोमवारी) पुन्हा असेच घडले. चारच्या सुमारस कुणी नसताना गोट्याने घरात येऊन पैशाची मागणी केली. यात नकार दिल्याने दोघात वाद झाला. फिरोजने तिच्या मफलरने गळा आवळला. त्यातच तिचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. या झटापटीत तिच्या तोंडाला मार लागल्याचे दिसून आले आहे. मृत्यूदरम्यान तिच्या गळ्यातील चेन व कानातील दागिने त्याने जबरदस्ती काढून घेतल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. 
दरम्यान, फिरोजने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अत्यवस्थेत त्याला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जयश्रीचे मिरजेतील माहेरची मंडळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. सांगली ग्रामीण व उपाधीक्षक संदीपसिंह गिल, ग्रामीणचे सहायक निरीक्षक देसाई यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. 

शासकीय साक्षीदार मिळेना 
घटनास्थळाचा पंचनामा करत आसताना सरकारी कर्मचारी याची साक्ष लागते. कुणीही साक्षीदार मिळेना. कसबेडिग्रज कृषी विद्यालयातील मंडळीनी तर निमसरकारी आहे म्हणत स्पष्ट नकार दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman murdered in kasbedigaraj