प्रितंका पोटे या तुरची येथील पोलिस (Vita Police) प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या.
विटा : मोटारीने धडक दिल्याने महिला पोलिस (Woman Police) मोपेडस्वार प्रितंका अनंत पोटे (वय ३२, देवराष्ट्रे, ता. कडेगाव) या जागीच ठार झाल्या. हा अपघात (Car Accident) मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलवडी (भा. ता. खानापूर) येथे बलवडी फाट्यावर झाला. याबाबत महिलेचा दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.