
-शैलेश पेटकर
सांगली : निपचित पडलेले खेचर... आपल्या पोटचं पिल्लू गेलं, याची त्याच्या आईला जाणीव झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. ती सैरभैर झाली. पिल्लाला चाटू लागली, वास घेऊ लागली. तिला वाटलं चमत्कार होईल, पिल्लू उठेल... मात्र तसं काही होणार नव्हतं. माणसांची गर्दी ती पाहून केवळ हळहळत होती. त्यांच्या तरी हाती काय होतं? प्राणिमित्र कौस्तुभ पोळ आले, पालिकेला कळवलं, सहा तासांनी यंत्रणेला जाग आली. माणसं मेली तरी पर्वा न करणाऱ्यांना खेचराची किंमत काय असणार? त्यांनी कचऱ्याच्या गाडीत घालून तो मृत देह नेला.