पालकत्वाच्या शिक्षणासाठी गृहिणी सरसावल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे बालवाडी शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम घेतला जातो. यंदा या अभ्यासक्रमाला 225 महिलांनी प्रवेश घेतला आहे. यात सुमारे 50 ते 60 गृहिणी आहेत. 

नोकरी, व्यवसायासाठी नव्हे तर मुलांचे पालकत्व चांगल्याप्रकारे करता यावे, यासाठी त्या शिक्षण घेत आहेत. सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या संगोपन कसे करायचे? याचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. गृहिणींचा प्रतिसादही याचा चांगला आहे. 

नोकरी आणि व्यवसायासाठी शिक्षण हे समीकरण रूढ झाले आहे, मात्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील अभ्यासक्रमांना विद्यार्थी आनंदासाठी किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रवेश घेतात. यातील बालवाडी शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमही यापैकीच एक आहे. सहा महिन्यांच्या या कोर्समध्ये मुलांच्या मानसिकतेपासून अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम बनवला आहे. या अभ्यासक्रमात विविध शाळांना भेटी दिल्या जातात. वयाच्या 5 ते 12 या वर्षांत मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. अशा काळात त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे आहे. यातून त्यांना अध्यापनाच्या विविध पद्धतींची माहिती दिली जाते. याचा फायदा त्यांना घरी मुलांचा अभ्यास घेताना होतो. ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत हा अभ्यासक्रम जिल्ह्याच्या विविध भागांत घेतला जातो. 

यंदा 225 महिलांचा प्रवेश 
यंदा या अभ्यासक्रमाला 225 महिलांनी प्रवेश घेतला आहे. यात सुमारे 50 ते 60 गृहिणी आहेत. सर्वसाधारणपणे बालवाडीमध्ये सेविका म्हणून नोकरी करता यावी. किंवा स्वतःचे पाळणाघर सुरू करता यावे, या उद्देशाने हा अभ्यासक्रम केला जातो. त्यामुळे पदवीधर तरुणी हा कोर्स करतात, मात्र उच्च शिक्षित किंवा पदवीधर गृहिणींनीही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. काही महिला 50 वर्षांपेक्षाही जास्त वयाच्या आहेत. 

बालवाडी शिक्षक व शिक्षण या अभ्यासक्रमाचा उद्देश केवळ बालवाडी सेविका बनवणे हा नाही, तर महिला आणि पुरुषांना सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणे हा आहे. माता-पित्यांनी याचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांना मुलांची मानसिकता लक्षात येईल. 
- डॉ. सुमन बुवा, प्रभारी संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women ahed guardianship for child education