दोन चिमुकल्यांना विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे एका महिलेने घरगुती कारणावरून दोघा मुलींना विष पाजवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. 

रेश्मा कृष्णा भोसले (वय 30) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेश्मा यांनी स्वतः च्या मुली श्रावणी (वय 4), श्रेया (वय 2) यांना विष पाजवून मारले. मुलींना विष पाजवल्यानंतर स्वतः ही विष प्राशन केले. विषामुळे काहीच परिणाम न झाल्यामुळे गळफास घेतला. गळफास अयशस्वी झाल्याने पाण्याचा हौदात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही मुली मृत झाल्या असून रेश्मा अत्यावस्थेत आहे. पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

नान्नज गावापासून काही अंतरावर भोसले कुटुंब राहत आहे. ते शेतमजुरी करून आपली उपजीविका करत होते. शनिवारी सकाळी घरगुती कारणावरुन पती व पत्नीमध्ये वाद झाला. याच तणावातून रेश्माने मुलींना विष पाजले. आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Attempt to Suicide in Solapur