अनैतिक संबंध नाकारल्याने दिराने केला वाहिनीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जत तालुक्यातील खिलारवाडी बयाजी लोखंडे आणि सुनीता लोखंडे हे मोल मजुरी करणारे कुटुंब राहते. सुनीता लोखंडे यांचे हिने दीर पांडुरंग लोखंडे यांच्याशी अनैतिक संबंध होते. हे नवरा बयाजी यांना कळले. त्यांनी याला विरोध केला आणि पत्नीला समजावून सांगितले. 

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यातील खिलारवाडी येथे अनैतिक संबंध नाकारल्याने दिराने वाहिनीचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत तालुक्यातील खिलारवाडी बयाजी लोखंडे आणि सुनीता लोखंडे हे मोल मजुरी करणारे कुटुंब राहते. सुनीता लोखंडे यांचे हिने दीर पांडुरंग लोखंडे यांच्याशी अनैतिक संबंध होते. हे नवरा बयाजी यांना कळले. त्यांनी याला विरोध केला आणि पत्नीला समजावून सांगितले. सुनिता यांनी हे अनैतिक संबंध तोडले हे दीर पांडुरंग लोखंडे याला आवडले नाही त्याचा राग आला आणि या रागाच्या भरात पांडुरंग लोखंडे आणि त्याच्या मित्राने  बयाजी लोखंडे हे कामाला गेले असल्याचे बघून रात्रीच्या सुमारास सुनीता लोखंडे यांना चाकूने वार केले.

या हल्ल्यात सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. लोखंडे घरी परतल्यावर त्यांना ही माहिती कळल्यावर त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि त्यांनी माहिती पोलिस स्टेशनमध्ये सांगितले आणि गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: women murder in Sangli

टॅग्स