Killemachindragad News : महिला सरपंच नावाला आणि पतीदेव गावच्या कारभाराला: वाळवा तालुक्यातील परिस्थिती

राज्यातील सरपंच, सदस्यांच्या नातेवाईकांचे ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप होत असलेचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
sarpanch
sarpanchsakal

किल्लेमच्छिंद्रगड - राज्यातील सरपंच, सदस्यांच्या नातेवाईकांचे ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप होत असलेचे शासनाच्या निदर्शनास आले आहेत. सरपंच, सदस्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप करु नये.

विशेषतः त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मुळीच बसता कामा नये. असे शासकिय धोरण आहे. तथापि आजही ग्रामीण भागात महिला सरपंचांच्या अधिकारावर गदा आणून पतिदेवाचा राजरोसपणे हस्तक्षेप सुरू असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागात महिला तसेच आरक्षित सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत पक्ष प्रमुख अगर महिला सरपंच यांचे पती, नातेवाईक मासिक मीटिंग, ग्रामसभामध्ये आसनस्थ होऊन आपणच गावचे कर्तेकरविते असल्याच्या थाटात राजकारण करतात. वेळप्रसंगी नागरिकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात.

काही ग्रामपंचायतीत 'महिला सरपंच नावाला आणि पतीदेव गावच्या कारभाराला' अशी परिस्थीती निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येवू लागल्याने शासनाने अशा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचेवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी शासनाने परिपत्रक २००७ मध्ये काढले होते. आजअखेर त्याची अंमलबजावणी किती आणि कशा प्रकारे झाली हा स्वतंत्र अध्ययनाचा विषय होवू शकेल इतकी सद्या ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे.

sarpanch
Kiran Magar : कळंबचा युवा खेळाडू करणार राज्याच्या कबड्डीच्या संघाचे नेतृत्व

कोणत्याही गावच्या मासिक सभा, ग्रामसभा अगर इतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सरपंच, पदाधिकारी यांच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या कामकाजाविषयी नातेवाईकांना हस्तक्षेप करता येणार नाही. अगर त्यांच्या आसनावर बसता येणार नाही. ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःच्या कामाशिवाय वावर करता येणार नाही.

तथापि असे कृत्य केल्याचे आढळून आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अथवा थेट आयुक्तांकडे नोटकॅम कॅमेऱ्याद्वारे काढलेले फोटो अगर व्हिडीओ शुटींगच्या पुराव्यासह तक्रार केल्यास संबंधित सरपंच, सदस्य यांना चौकशीअंती पदावरून कायद्याने पायउतार व्हावे लागणार आहे.

पतीदेवांनी महिला सरपंच यांच्या कामकाजात हस्तक्षेप न केल्यास होणारे फायदे

  • रोजच्या दैनंदिन कामकाजासाठी सरपंच यांना घरी राहून कारभार करता येणार नाही. कामकाजातील हस्तकबाजी संपुष्टात येईल.

  • सरपंच, सदस्य यांचेसाठी तालुका, जिल्हा पातळीवर होणाऱ्या मिटींगसाठी त्यांना स्वत: हजर राहावे लागेल.

  • सरपंच, सदस्य यांच्या नावाखाली ग्रामपंचायतीत होणारी नातेवाईक, हस्तकांची दादागिरी थांबेल.

'लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या महिला सरपंच, सदस्यांच्या कामकाजात नातेवाईकांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. सरपंच आणि सदस्यांच्या नातेवाईकांचा ग्रामपंचायत कारभारात होणारा हस्तक्षेप मोडीत काढण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून जे दोषी आढळतील त्याच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तरच महिला सरपंच, सदस्य स्वतंत्ररित्या प्रभावी काम करू शकतील.

- सौ. विजयमाला पाटील, माजी उपसरपंच, बहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com