
सांगली : महिला गृहउद्योगाच्या नावाखाली सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील दीड ते दोन हजार महिलांकडून अनामत रक्कम घेत तब्बल ८६ लाख २८ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीतील गुरुकृपा महिला गृहउद्योग कंपनीच्या दोन संचालकांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.