
सांगली : ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समाज माध्यमांतून संपर्कात आलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुकय्या तौफिक पटेल (बालाजीनगर, गेट क्र. ३ च्या समोर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा प्रकार ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत घडला.