नेर्ले गावच्या स्वतंत्र पाईपलाईनचे काम पूर्ण 

विजय लोहार
Saturday, 12 December 2020

नेर्ले : येथील कृष्णा नदीपासून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नूतनीकरण करण्यात आली आहे. जलमिशन योजनेतून अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकीसाठी मंत्री जयंत पाटील यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषद सदस्या संगीता संभाजी पाटील यांनी दिली. 

नेर्ले : येथील कृष्णा नदीपासून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नूतनीकरण करण्यात आली आहे. जलमिशन योजनेतून अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकीसाठी मंत्री जयंत पाटील यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषद सदस्या संगीता संभाजी पाटील यांनी दिली. 

नेर्ले गावाला अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. पाण्याचा प्रश्न कायम पेटत राहिला आहे. पेयजल की प्रादेशिक यातच खूप वेळ गेला. याबाबत "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने या प्रश्‍नी आवाज उठवला आहे. 

नेर्लेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. कृष्णा नदीपासून नवीन व स्वतंत्र पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नेर्लेकरांचे कित्येक वर्षे सडलेल्या पाइपचे पाणी आता बंद होणार आहे. गावातील अंतर्गत पाईपलाईन जुनी आहे. ही अंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नवीन होणे गरजेचे आहे. गावातील रस्ते होण्याअगोदर पाईपलाईन व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

या भागाचा होणार सर्व्हे! 
संपुर्ण नेर्ले गाव, सर्जेराव दादा मळा, सदा पाटील मळा, एल. पी. पाटील मळा, माळी मळा, बिरोबा बन परिसर व इतर सर्व भागाचा सर्व्हे होणार असल्याची माहिती माजी सरपंच संभाजी पाटील यांनी दिली. 

नेर्लेतील पाणी प्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी जलमिशन योजनेतून अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी नवीन बांधण्याची पत्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले होते. यावर मंत्री पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र देऊन संबंधित अधिकारी यांना याबाबत आदेश करावा अशी शिफारस केली आहे. 
- संगीता पाटील, सदस्या जिल्हा परिषद, सांगली.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on a separate pipeline from Nerle village completed