World Bamboo Day : पर्यावरण संवर्धनासाठी हवा बाबूंच्या वस्तूचा वापर

अमोल सावंत
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बांबूपासून आर्थिक क्षमता वाढावी. सामान्य लोकांना बांबुतून मिळणाऱ्या अर्थकारणाचा फायदा व्हा, या हेतूने या दिवसाची निर्मिती केली. यासाठी प्रत्येकाने बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा दररोजच्या वापरात उपयोग करावा. जागतिक बांबू दिवस साजरा करण्याचा उद्देश सफल होईल. आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार मिळेल. 

कोल्हापूर - बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने यंदा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाची स्थापना केल्याचे घोषित केले. 
जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांनी बांबूचे महत्व वाढवावे. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर करावा. बांबूपासून आर्थिक क्षमता वाढावी. सामान्य लोकांना बांबुतून मिळणाऱ्या अर्थकारणाचा फायदा व्हा, या हेतूने या दिवसाची निर्मिती केली. यासाठी प्रत्येकाने बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा दररोजच्या वापरात उपयोग करावा. जागतिक बांबू दिवस साजरा करण्याचा उद्देश सफल होईल. आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार मिळेल. 

वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही, असे धोरण भारतीय वन कायदाच्या कलमानुसार सरकारने जाहीर केले. बांबू किती जुना आहे, यावर कठीणपणा अवलंबून असतो. बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर उत्पन्न मिळायला सुरवात होते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते.

निरनिराळ्या हवामान, पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या १४०० बांबूंच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जातींची तर दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होते. जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. 

बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे, या पिकाला पाणी, खते कमी प्रमाणात लागतात. या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापर कमी होतो. बांबूचे आशियात उत्पादन वीस वर्षांत गतीने वाढले आहे. भारतात तर सर्व प्रदेशात बांबूची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पठाराव बांबूची मोठी वने ही आहेत. विशेषत: तिलारी घाटात आहेत. 

आहारातील स्थान
बांबूची कोवळी पाने, फांद्या, कोंब हे चीनमधील जायंट पांडा, नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे. आफ्रिकेतील जंगलातील गोरिलासुद्धा बांबूचे सेवन करतात. भारतातसुद्धा शेळ्या, मेंढ्या, गाई-म्हैशी, बैल, अन्य प्राणी बांबूची कोवळी पाने मोठ्या प्रमाणात खातात. बांबूच्या वनांमध्ये अनेक पक्ष्यांचा अधिवास ही असतो.

बांबूपासून मिळणाऱ्या वस्तू

 •  धाग्यापासून विणलेले शर्ट, मोजे, टॉवेल, डायपर. 
 •  सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंगच्या फळ्या, लॅपटॉप अन्‌ संगणकांचे बाह्य कवच 
 •  बांबूचे फ्लोअरिंग आणि तक्ते
 •  उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेले, रेस्टॉरंट, शाळा आदी ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्‍य  
 •  बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्‍य
 •  बासरी बनविण्यासाठी उपयोग
 •  वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून फळ्या, प्लाय-बोर्डचे तक्ते तयार होतात
 •  बांबूचे छोटे तुकडे सरसामधे भिजवून विटा, तक्तेही बनवले जातात. 
 •  बांबूपासून नैसर्गिक रंगही मिळतो. 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Bamboo Day Needs use of Bamboo made product Special story