लोकसंख्या वाढीचे प्रमाण घटणार? आरोग्य विभागाचा अंदाज

लोकसंख्या वाढीचे प्रमाण घटणार? आरोग्य विभागाचा अंदाज

सांगली : कोरोना (Covid 19) महामारीमुळे गतवर्षी होणारी जनगणना होऊ शकली नाही. मात्र प्रशासनाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे लोकसंख्येची प्रति हजारी होणारी वाढ किंचित घटेल असा अंदाज आहे. २००१ ते २०११ या दहा वर्षांतील लोकसंख्या वाढीचा वेग हजारी अठरा होता. या वेळी तो सोळा इतका असेल. म्हणजे त्यात दोनने घट होईल असा अंदाज आहे. world-population-day-2021-special-population-rate-of-growth-decrease-in-sangli

ब्रिटिश काळापासून दर दहा वर्षांनंतर लोकसंख्या मोजली जाते. त्यासाठी देशभर मोठी यंत्रणा राबत असते. गतवर्षीच त्याची मोजणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीने जनगणना पुढे ढकलण्यात आली आहे. सरकार आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून कोरोना साथीत लसीकरणासाठी वापरली जाणारी माहिती आधार धरली, तर लोकसंख्येत वाढ असली तरी वाढीचा वेग मात्र कमी झालेला असेल असे जाणकरांचे मत आहे. जिल्ह्यांची लोकसंख्या ३० लाख ७१ हजार ३७२ असल्याचे गृहित धरुन सध्या कोरोना लसवाटप सुरू आहे. २०११ च्या जगणननेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या विचार घेता ही वाढ २ लाख ४९ हजार २२९ इतकी आहे.

२००१ च्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८३ हजार ५२४ होती. २०११ मध्ये २८ लाख २२ हजार १४३ एवढी झाली. या दहा वर्षांत २ लाख ३८ हजार ६१९ नी लोकसंख्या वाढ झाली आहे. आता येत्या जगगणनेत ३१ लाखच्या आसपास असेल. आरोग्यविभागाकडून वेगवेगळ्या सर्वेक्षण व लसीकरणासाठीच्या माहितीचा आधार विचारात घेता सध्याची जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख ७१ हजार ३७२ गृहित धरली आहे.

२००१ ते २०११ या काळात प्रति हजार लोकसंख्येत १८ ने वाढ झाली होती. त्यात दोनने घट होऊन प्रति हजारी १६ वर येईल, असा अंदाज आहे. दोन अपत्यांवर कुटुंब नियोजनाकडे कल दिसत आहे. त्यामुळे वाढीचा वेग काहीसा कमी आहे. शिक्षणाचा प्रसार, आर्थिक स्तर उंचावल्याने लोकसंख्येत प्रभावी घट होते असे तज्ज्ञ सांगतात.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

दृष्‍टिक्षेप

० जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता-३३० प्रति चौरस किलोमीटर

० प्रती हजारी पुरुषांमागे स्‍त्रियांची लोकसंख्या ९६६

० साक्षरता- ७७.६२ टक्के

० जानेवारी २०२१ मध्ये २४ हजार ७५३ नवमतदारांची नोंद

० त्यात १८ ते १९ वयोगटातील ९ हजार १११ मतदारांची संख्या

० जिल्ह्यात एकूण मतदार २३ लाख ९० हजार ५३७

२०११ च्या गणतीनुसार

० हिंदू- ८६.७४ टक्के

० मुस्‍लिम- ८.४९ टक्के

० जैन- ३.१ टक्के

० बौद्ध- १.३५ टक्के

० ख्रिचन- ०.३२ टक्के

० जात नसणारे ०.१९ टक्के

० इतर जाती- ०.०७ टक्के

लोकसंख्या वाढ....

सन, लोकसंख्या, वाढीचा दर

१९०१, ६४५६९६, -------

१९११, ६१३७५१, -०.५१ टक्के

१९२१, ५९७३७१, -०.२७ टक्के

१९३१, ७०८८५८, १.७३ टक्के

१९४१, ८१४४४९, १.४० टक्के

१९५१, १०००३७५, २.०८ टक्के

१९६१, १२३२९८६, २.११ टक्के

१९७१, १५४२५६०, २.२७ टक्के

१९८१, १८३४२९३, १.७५ टक्के

१९९१, २२०९४८८, १.८८ टक्के

२००१, २५८३५२४, १.५८ टक्के

२०११, २८२२१४३, ०.८९ टक्के

संभाव्य....

२०२१, ३०७१३७२, ०.८८ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com