सांगलीतील "या" पैलवानाची कोल्हापूरच्या खासबाग मैदानात अडीच तास चाललेली कुस्ती इतिहासात सुवर्णमय नोंद

Wrestler maruti mane Anniversary article by balasaheb gane
Wrestler maruti mane Anniversary article by balasaheb gane

 तुंग (सांगली) : कुस्ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली कुस्ती म्हणजे 6 मार्च 1965 रोजी झालेली पै.मारुती माने  व पै. विष्णूपंत सावर्डेकर यांची कुस्ती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील ही कुस्ती तब्बल अडीच तास चालली. मैदानात लोकांना बसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा खेडेगावात 27 डिसेबर1937 रोजी  जन्म झालेल्या अन वयाच्या आठव्या वर्षापासुन लाल मातीतल्या कुस्तीच्या माध्यमातून देशभर  नावलौकिक मिळवणारे कै.मारुती माने यांची आज जयंती. या निमित्त त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळतो.

पहिले "महाराष्ट्र केसरी' पै. दिनकर दह्यारी यांच्याशी 18 एप्रिल 1959 रोजी त्यांची प्रेक्षणीय कुस्ती होऊन ती बरोबरीत सुटली.
त्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरवात झाली. सर्वप्रथम त्यांनी कटक येथे झालेल्या एशियन गेम चाचणी स्पर्धेत पै. भीम सीलाराम यांच्यावर मात केली आणि 1962 च्या जाकार्ता एशियन स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. त्या स्पर्धेत त्यांनी फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये सुवर्णपदक व ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात रौप्यपदक अशी पदके मिळवली. या पराक्रमानंतर रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली; पण त्या वेळी त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.1964 ला करनाल येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीन पैलवानावर मात करून त्यांनी "हिंदकेसरी'पद मिळवले. त्यानंतर शारीरिक दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये त्यांना भाग घेता आला नाही. 1970 मध्ये एडिंबरो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. 

या दरम्यान आप्पा करजगी, भगवान मोरे, नाथा पारगावकर, महंमद हनिफ या त्या वेळच्या अव्वल पैलवानां बरोबर कुस्त्या करून कुस्ती क्षेत्रात त्यांनी दबदबा वाढवला. कुस्ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली कुस्ती म्हणजे 6 मार्च 1965 रोजी झालेली त्यांची व पै. विष्णूपंत सावर्डेकर यांची कुस्ती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील ही कुस्ती तब्बल अडीच तास चालली. मैदानात लोकांना बसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. त्यानंतर सांगलीमध्ये हिंदकेसरी हजरत पटेल, शाहूपुरी यांच्यावर 14 मिनिटांत त्यांनी मात केली. संपूर्ण महाराष्ट्रात ती कुस्ती गाजली.


महान मल्ल सादिक पंजाबीने महाराष्ट्राला आव्हान दिले होते. ते स्वीकारून कोल्हापूर येथे खासबाग मैदानात सादिकला चारीमुंड्या चीत करून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आक्रमकता आणि चपळता यात वाक्‌बगार असणारे मारुती माने यांना लाल मातीतल्या पारंपरिक कुस्तीचे प्रतीकच म्हणावे लागेल. कुस्तीतील योगदानाबद्दल दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे.

कुस्तीतील कारकीर्द 

ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग

आशियाई सुवर्ण व रौप्यपदक,
 राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता
 हिंदकेसरी

संघटक पदे 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष - १९८५ - १९८६अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद सदस्य - १९८१ - २०१०अखिल भारतीय माजी मल्ल संघटना - उपाध्यक्ष - १९९२ - २०१राजकीय कारकीर्द संपादन करा
कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच
 सांगली जि. प. चे सदस्य - १९६० - १९७२राज्यसभा खासदार - १९८५ - १९८६
ध्यानचंद पुरस्कार

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com