
राज्यपाल कामांना आडकाठी आणण्याचे काम करतात
जत (सांगली) : राज्यातील कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीवरून राज्यपाल मुख्यमंत्र्यांना उलट प्रश्न विचारतात. देशाच्या घटनात्मक पदाचा आम्ही आदर करतो. मात्र, राज्याच्या घटनात्मक राज्यपाल पदावर योग्य माणूस बसला नाही. त्यामुळे जतला कृषी महाविद्यालय होत नाही. असे खळबळजनक वक्तव्य महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
जतमध्ये ‘माळरान कृषी, पशुप्रदर्शन व कृषी सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री ठाकूर यांनी थेट राज्याच्या राज्यपाल यांनाच टीकेचे लक्ष केले. राज्यपाल कामांना आडकाठी आणण्याचे काम करतात, असा आरोप श्रीमती ठाकूर यांनी केला. दरम्यान, ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मासळी जाळ्यात आली असेल म्हणून पहाटे पाहायला गेला अन् घडलेल्या घटनेने गावकरीही हळहळले -
संपादन - स्नेहल कदम