Video : ...अन् खासदार श्रीनिवास पाटलांच्या डाेळ्यात अश्रू

Video : ...अन् खासदार श्रीनिवास पाटलांच्या डाेळ्यात अश्रू

कऱ्हाड : जेष्‍ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रितिसंगमावरील समाधीस्थळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदींसह मान्यवरांनी अभिवादन केले. दरम्यान आदरणीय पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने जयंतीनिमीत्त विविध शाळांतील 12 हजार विद्यार्थ्यांनी शब्दसुमनांची आदरांजली वाहिली.


अभिवादनानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांना गहिवरुन आले. यशवंतराव चव्हाण यांची समाधी पालिकेतर्फे फुलांनी आकर्षक सजावण्यात आली होती. सकाळपासूनच विविध खेत्रातील मान्यवरांसह नागरीक समाधीस अभिवादन करण्यासाठी येत होते. दुपारपर्यंत खासदार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष कबुले, उपाध्यक्ष विधाते, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार, आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्‍ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, जशराज पाटील, प्रकाशराव पाटील, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, प्रदीप पाटील, निवास थोरात, अर्चना देशमुख, सागर शिवदास, शंकरराव खबाले, श्री. देसाई, माजी सभापती शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती किरण पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, अंजली कुंभार, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती सविता खाडे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मनोज जाधव, नगरअभियंता ए. आर. पवार, आर. डी. भालदार, मिलींद शिंदे, सचीन कोकणे, माणिक बनकर, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीकांनी समाधीस अभिवादन केले.


यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी... 

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

हेही वाचा : Coronavirus : पाचगणीतील शाळांनी घेतला हा निर्णय

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

 सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

हेही वाचा : पोक्‍सो कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.

संग्राहक -- राजेंद्र पवार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com