यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या पावित्र्याचे काय?

karhad
karhad

कऱ्हाड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ व बागेत येणाऱ्या उत्साही युवक युवतींकडून बिनधास्त मोबाईलवर सेल्फी काढले जात आहेत. वास्तविक समाधी परसिरात बसण्यास व फोटो काढण्यास मनाई असतानाही त्याचे सरळसरळ उल्लंघन होताना दिसते आहे. त्यावर पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे. वास्तविक युवकांना तेथून हुसकावण्याचा प्रय़त्न करणाऱ्या वॉ़चमनला ते धमकावतात. बागेसह समाधी परिसरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावरून त्या युवकांवर पोलिसांना सांगून थेट कारवाईची होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी पालिकेने पुढाकार घेवून तक्रार देण्याची गरज आहे, अशी मागणी यशवंत प्रेमींकडून होत आहे. 

पहिले मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असे देशाचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ यशवंतराव चव्हाण यांचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी निधन झाले. त्यांच्यावर येथील प्रीतीसंगमावर अंत्यसंस्कार झाले. जेथे अंत्यसंस्कार झाले. त्यालाच लागून स्वामीची बाग होती. अंत्यसंस्कार व बागेच्या जागी यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक व्हावे, यासाठी त्यावेळी ज्येष्ठनेते पी. डी. पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर तेथे स्मारक, बाग विकसीत करण्यात आली. बागेत सध्या अनेक बदल करण्यात आले आहे. ज्या दिवसांपासून बाग झाली, त्या दिवसांपासून रोज सायंकाळी तेथे फिरायला येणाऱ्या नागरीकांची गर्दी मोठ्य़ा प्रमाणात होते. सुट्टीचा दिवस असेल तर गर्दी वाढतेच. त्यामुळे अनेकदा वाहतूकीच्या कोंडीचाही प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. त्या भागातील प्रश्न सोडवताना पोलिस व पालिका यांचा समन्वय गरजेचा आहे. मात्र तो दिसत नाही. समादी परिसरात अनेक नियम केले आहे. मात्र त्यातील अनेक नियम पाळले जात नसल्याने उत्साही युवक, युवतींमुळे त्याचे पावित्र्य भंग होताना दिसते. 

ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधी परिसरात छोटा कट्टाही आहे. त्या समाधीला प्रदक्षीणा घालून पुढे सरकत जायचे असा नियम आहे. त्यामुळे कट्ट्यावरही कोणास बसून दिले जात नाही. तेथे फोटो काढण्यासही मनाई आहे किंवा फोटो काढलाच तर एखदा दुसरा काढावा, असा अलीखीत नियम आहे. मात्र त्या समाधी परिसरात न बसून न देण्याचा नियम आहे, तो काटेकोरपणे पाळला जात आहे. मात्र अलीकडे काही युवक व युवतींच्या अती उत्साहीपणामुळे त्या समाधी परिसराचे पावित्र्यच भंग होत असल्याचे दिसते आहे. मोबाईलवर सेल्फी काढताना नियामाची पायमल्ली करतोय, याचे भानच त्या उत्साही युवतींसह युवकांना राहिल्याचे दिसत नाही. त्यांना हटकणाऱ्या पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाच ते उलटे धमकावताना दिसतात. त्यामुळे या स्थितीत बदल होण्यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेवून उत्साह सेल्फीमास्टर युवकांना धडा शिकवण्याची गरज आहे. 

यशवंतराव चव्हाणांच्या माहितीची होर्डींग्ज लावावी..
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी 25 नोव्हेंबर म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्री मंडळ अभिवादनाला येते. 1985 पासूनची ही रितच झाली आहे. विधान सभेतही अभिवादन करण्याचा ठराव आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्मारकाला विशेष महत्व आहे. त्याचे भान नव्या पिढीला नाही. त्यामुळे त्यांना त्याची माहिती व्हावी, यासाठी समाधी स्मारकातील पर्णकुटीबाहेरील जागेत पालिकेने पुढाकार घेवून त्याची माहितीची होर्डींग्ज आकर्षक रूपात लावण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com