आता वर्षभर पिऊ शकता पावसाचं पाणी! 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत वाढतेय जागरुकता, 'या' समाजात अधिक जागृती

पावसाचे पाणी पिण्यासाठी साठवणारे आणि जमिनीत मुरवणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत शंभरीपार गेली आहे.
Rain Water Harvesting
Rain Water Harvestingesakal
Summary

छतावर पडणारे पहिल्या पावसाचे पाणी सोडून दिले जाते. त्यानंतर फिल्टरद्वारे ते पाणी टाकीमध्ये पाणी साठवले जाते. उन्हापासून संरक्षण केले जाते.

सांगली : पावसाचे की भूगर्भातील... नदीचे की विहिरीचे... झऱ्याचे की धरणातील... यातले कुठले पाणी पिण्यासाठी योग्य, यावरून चर्चा होत असते. यात पावसाचे पाणी चांगले असे समजून ते साठवून वर्षभर पिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यासाठी ते ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’सारखा (Rain Water Harvesting) पर्याय निवडला जात आहे. पावसाचे पाणी पिण्यासाठी साठवणारे आणि जमिनीत मुरवणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत शंभरीपार गेली आहे.

जमिनीतील पाण्याची पातळी घटली, तरच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करायचे, असा अनेकांचा समज असतो, तरीही १५ वर्षांपूर्वीच पावसाचे पाणी साठवायची आणि मुरवायची चळवळ शहरात सुरू झाली. डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. श्रीनिवास लड्डा, डॉ. सुहास खांबे, डॉ. मनोज पाटील यांनी त्या काळात आठ ते दहा हजार रुपये खर्च करून यंत्रणा बसवली. त्याआधी काही अपवाद असू शकतात.

Rain Water Harvesting
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

शहरातील बालाजीनगर, पार्श्वनाथनगर, विश्रामबाग, दत्तनगर या भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची कामे झाली आहेत. चातुर्मासात शुद्ध पाण्याची गरज असते, त्यामुळे जैन समाजात याबाबतची जागृती अधिक आहे. त्यामुळे गावभागातील जैन मंदिरात देखील रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.

महापालिकेकडून ४ टक्के सवलत

रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, गांडूळखत प्रकल्प, होम कंपोस्टिंग करणे, सांडपाण्याचा निचरा करणे यापैकी तीनची पूर्तता केल्यास किंवा फाईव्ह स्टार घर असल्यास महापालिकेकडून सामान्य करात ४ टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.

Rain Water Harvesting
Annual Horoscope 2024 - कन्या रास : 'उजळेल भाग्य, पण जपा आरोग्य'; वर्षभरात कशी असेल आपली 'रास'

...असे होते रेनवॉटर हार्वेस्टिंग

छतावर पडणारे पहिल्या पावसाचे पाणी सोडून दिले जाते. त्यानंतर फिल्टरद्वारे ते पाणी टाकीमध्ये पाणी साठवले जाते. उन्हापासून संरक्षण केले जाते. प्लम्बिंग आणि टाकी मिळून २० ते २२ हजार रुपये खर्च येतो. अतिरिक्त पाणी जमिनीत मुरवले जाते. शोषखड्ड्यासाठी ३ बाय ३ चा दोन फुट खड्डा काढून सच्छिद्र पाईप आणि बाजूला विटा, वाळू, दगड टाकले जातात. पावसाचे पाणी भूगर्भात मिसळल्याने कूपनलिकेमधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

तीन वर्षांत अनेकजण सहभागी

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत १ लाख २३ हजार ९२० निवासी मालमत्ताधारक असून २७ हजार ३५२ व्यावसायिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी ९० मालमत्ताधारकांनीच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १२, २०२२-२३ मध्ये ३४, तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४४ मालमत्ताधारकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. (चालू वर्षातील आकडेवारी १ नोव्हेंबर २०२३ अखेरची आहे. यात आर्थिक वर्ष संपेपर्यंत आणखी भर पडू शकते.)

Rain Water Harvesting
'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

स्वत:च्या घरी २०१२ मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. पावसाचे साठवलेले पाणीच वर्षभर पिण्यासाठी वापरतो. दोन वर्षांतून एकदा पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते. फक्त पाण्याच्या टाकीत शेवाळ होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. कुठल्याही आरओ सिस्टिमची गरज नाही.

- डॉ. मनोज पाटील, सल्लागार, रेन वॉटर हार्वेस्टिंग

मिरज तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत १.३० मीटरने घटली आहे. यावर्षीच्या मॉन्सुनोत्तर काळातील चाचणीतील हा निष्कर्ष आहे. पर्जन्यमानाची अनियमितता व दोलायमानता यामुळे भूजल पातळीमध्ये घट आली आहे.

- अमित जिरंगे, प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com