नसेल फास्टटॅग तर आजपासून डबल टोल 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 जानेवारी 2020

या ठिकाणी मिळणार फास्टॅग 
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील सावळेश्वर, वरवडे (जि. सोलापूर) येथील पथकर नाक्‍यावर, सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील तामलवाडी, येडशी व पारगाव येथील पथकर नाक्‍यावर फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाहनधारकांना माय फास्टॅग ऍपव्दारे फास्टॅग उपलब्ध करून घेता येतील. एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्‍सिस व इंडस्‌ या बॅंकेत विहित केलेल्या प्रक्रियेनुसार फास्टॅग उपलब्ध करून घ्यावेत. तसेच ऍमेझॉन, पेटीएम ऑनलाइन संकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. 

सोलापूर : फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकर नाक्‍यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. उद्यापासून (मंगळवार, ता. 14) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. रोख रकमेव्दारे पथकर स्वीकारण्यासाठी टोलनाक्‍यावर एकच लेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोखीने पथकर देणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकर आकारणी केली जाणार असल्याची माहिती अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. 

aschim-maharashtra/solapur-zp-one-oclock-hearing-tomorrow-2-pm-commitee-election-251911">हेही वाचा - सोलापूर झेडपी : उद्या एक वाजता सुनावणी, दोन वाजता सभापती निवडी 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे देशभरातील सर्व टोल नाक्‍यावर इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रणालीव्दारे पथकर स्वीकारण्यास सुरवात केली आहे. यासाठी गाडीवर फास्टॅग लावणे बंधनकारक आहे यासाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14 जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली. रोखीने पथकर स्वीकारण्यासाठी पथकर नाक्‍यावर एकच लेन ठेवण्यात येणार आहे. फास्टॅग मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे याप्रमाणे - वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो, केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you travel without fasttag then double charg toll from today