esakal | सांगली : पाझर तलावात बुडून तरूणाचा मृत्यू 

बोलून बातमी शोधा

young boy dead in sangli shirol}

चिलरी व बोराटीच्या सहाय्याने  दोन तास त्याचा शोध सुरू होता. पण पाणी खोलवर असल्याने मृतदेह हाती लागत नव्हता

सांगली : पाझर तलावात बुडून तरूणाचा मृत्यू 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिराळा : रिळे (ता. शिराळा) येथील सूनील तानाजी गोसावी(वय ३०) या तरूणाचा बिऊर (शांतीनगर) येथील पाझर तलावात  बुडून मृत्यू झाला. याबाबत बिऊरचे पोलिस पाटील सीताराम पाटील यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोकरूड व शिराळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. 


याबाबत घटनास्थळ व पोलिसातून समजलेली माहिती अशी, दुपारी सुनील, भाऊ संतोष गोसावी, मावस भाऊ जगन्नाथ वसूरकर व सुभाष, मामा विठ्ठल घाडगे यांच्या समवेत शांतीनगर येथे आले होते. त्यावेळी सुनील पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
 

सुनील हा इस्लामपूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो अविवाहित आहे. त्याचे मुळगाव इस्लामपूर असून गेले १५ वर्षे रिळे येथे स्थायिक आहेत. वडील मजुरी करतात तर आई बेंटेक्स दागिन्यांची फिरून विक्री करते. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे.

चिलरी व बोराटीच्या सहाय्याने  दोन तास त्याचा शोध सुरू होता. पण पाणी खोलवर असल्याने मृतदेह हाती लागत नव्हता. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता कांदे येथील हणमंत उर्फ सतीश गोसावी यांनी टायरच्या  इनरवर बसून अर्धा तासात शोध घेतला. सायंकाळी साडे सहा वाजता मृतदेह सापडला. मृतदेह सापडताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी रिळे व बिऊर येथील लोकांनी गर्दी केली होती. 


तो आनंद शेवटचा

रिळे येथील यात्रा १ व २ मार्चला होती. त्यासाठी  गोव्याहून सुनीलचे मावसभाऊ जगन्नाथ व  सुभाष आले होते. मावसभाऊ जगन्नाथ चा २ मार्चला वाढदिवस होता. सर्वांनी तो उत्साहात साजरा केला.  सांगली सांगली सांगली 
 
संपादन - धनाजी सुर्वे