...त्यामुळे तरूणांनी झोडपले शिक्षकाला  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकास तरुणांनी चोप दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील एका गावात घडली. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. दरम्यान, जबर मारहाण झाल्यानंतरही तो शिक्षक पोलिसात जाण्यास धजावला नाही. गाव पंचांनी या प्रकरणावर पडदा टाकला असल्याचे समजते.

खानापूर : महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकास तरुणांनी चोप दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील एका गावात घडली. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. दरम्यान, जबर मारहाण झाल्यानंतरही तो शिक्षक पोलिसात जाण्यास धजावला नाही. गाव पंचांनी या प्रकरणावर पडदा टाकला असल्याचे समजते.

हे पण वाचा -  कोकण रेल्वेच्या समोर बिबट्या आला अन्...

तालुक्‍यातील एका माजी आमदारांच्या गावात ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वजण कार्यक्रमाला गेल्याची संधी साधत सदर शिक्षक एका विधवा महिलेच्या घरात घुसला. त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून बदडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यादिवशी त्याने पोबारा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही तरुणांनी त्याला गल्लीतच गाठून चोप दिला. त्याचे चित्रीकरण मोबाईलवर करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. 

हे पण वाचा - नाणार रिफायनरी समर्थकांना शिवसेनेचा हा सवाल

या घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अशी घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याच्या वृत्ताला गावपंचांनी दुजोरा दिला. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हे प्रकरण गावपंचांनी मिटवल्याचे सांगून त्यावर पडदा टाकण्यात आला. या घटनेची चित्रफीत पोचल्यामुळे पोलिसांनीदेखील चौकशी केली. पण, तसे घडलेच नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. कुणाची तक्रार नसल्यामुळे गुन्हा नोंद झाला नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy eating teacher in belgaum