esakal | नगर : गारगुंडीमधील तरूण शेतक-याची आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

suside.jpg

पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील नितीन प्रकाश झावरे (वय ३८) या शेतक-याने घरामध्ये फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

नगर : गारगुंडीमधील तरूण शेतक-याची आत्महत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : नगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सत्र थांबण्यास तयार नाही. रविवार (ता. १) रोजी सायंकाळी पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील नितीन प्रकाश झावरे (वय ३८) या शेतक-याने घरामध्ये फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत माजी सरपंच अंकुश भास्कर झावरे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात खबर दिली.

याबाबत माहीती अशी की, नितीन हा गावामध्येच पत्नी व तो शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. काल दिवसभर तो गावामध्येच होता घरी आल्यानंतर पत्नी मंदीरामध्ये नैवद्य ठेवण्यासाठी गेली असता मागे परत आल्यानंतर दरवाजा वाजविल्यानंतर आतुन काहीच आवाज आला नाही, नंतर परिसरातील ग्रामस्थांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर घरामध्ये पत्र्याच्या एंगलला नितीन याने फाशी घेतलेली पहावयास मिळाली. झावरे यांनी पोलिसांना ही माहीती दिली. घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला मृतदेह मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील पठार भागात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असलेल्या गारगुंडी गावात वास्तव्यास असलेले नितीन झावरे हे मागील वर्षीच्या दुष्काळ व या वर्षी वाटाण्याच्या पिकाचे झालेले नुकसान यामुळे आर्थिक अडचणीत आले असल्याचे बोलले जाते. नापिकीमुळे स्वप्नभंग झालेले नितीन निराश झाले व त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असून, पठार भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे दुःख आता तरी प्रशासनाने समजून घ्यावे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top