सांगली : शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगी येणारे पेय देऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambag Police) तिघांना अटक केली आहे. यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून, तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे.