Shivjaynti 2020 : शिराळ्याच्या युवकांनी अमेरिकेत साजरी केली शिवजयंती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youngers from shirala celebrates shivjaynti in America

Shivjaynti 2020 : शिराळ्याच्या युवकांनी अमेरिकेत साजरी केली शिवजयंती...

सांगली - अमेरिकेतील न्यूयॉर्कचा भारतीय वाणिज्य दूतावास 'जय शिवाजी, जय भवानी' या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेला. निमित्त होतंय न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाचं....

 छत्रपती फाऊंडेशन, भारतीय वाणिज्य दुतावास आणि अल्बानी ढोल-ताशा समूह यांनी संयुक्तपणे या शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे, भारतीय वाणिज्य दूतावासातील दुत ए.के. विजयकृष्णन उपस्थित होते.
शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते. यावेळी अल्बानी ढोल-ताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेकाचे प्रयोग सादर केले. यासोबतच तबला, विणा वादनासह संगिताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाचा - लई भारी... अमेरिकेत टॅक्‍सी चालक ते वाहतूक नियंत्रक अधिकारी ; कोकरूडच्या युनूस अत्तार यांचा प्रवास

शिराळाच्या दोन युवकांचा सहभाग

अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांपैकी डॉ.युनूस अत्तार कोकरूड व सुरेश गायकवाड तडवळे ता.शिराळा तर कल्याण घोडे पाटील व विनोद शिंदे (औरंगाबाद) स्वप्नील खेडेकर( पुणे ) विजय मानकर यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले.


गेल्या तीन वर्षापासून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या माध्यमातून आम्ही शिवजयंती सह विविध उपक्रम राबवत आहे.
- डॉ.युनूस अत्तार
वाहतूक निरीक्षक वर्ग २ - न्यूयॉर्क

Web Title: Youngers Shirala Celebrates Shivjaynti America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..