
Sangli Crime News : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुरणात तरुण झाडाला लटकलेला आढळला. मृतदेह संशयास्पद अवस्थेत होता. गणेश राजू शिवपुजे (वय २२, खिळेगाव, ता. अथणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. १९) दुपारी कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद झाली.