
कोकरूड : येळापूर (ता. शिराळा) येथील मारुती सर्जेराव मोहिते (वय १९) याचा जीबीएस (गुलेन बॅरी सिंड्रोम) या आजाराने पुणे येथे उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाला. मारुती मोहिते हा चार महिन्यांपूर्वी पुणे येथे एका खासगी ऑनलाईन कंपनीमध्ये लागला होता. येळापूरहून प्रथमच तो नोकरीसाठी बाहेर पडला होता.