अप्पण्णा पाटील हे रस्त्याकडेला थांबले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते बैलगाडीच्या चाकाखाली सापडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
बेळगाव : बसवन कुडची येथील यात्रेत बैलगाडी शर्यतीदरम्यान (Bullock Cart Race) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अप्पण्णा पारीस पाटील (वय २७, रा. बसवाण कुडची, ता. बेळगाव) यांचा बुधवारी (ता. २६) मृत्यू झाला.