
कोल्हापूर : हत्यारांसह टोळक्याने केलेला पाठलाग चुकविण्याचा प्रयत्नात हर्षवर्धन उमेश मोरे (वय २७, रा. खंडोबा तालीम परिसर) याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आज रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पायाला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिकांनी जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. हल्लेखोरांनी जखमीच्या दुचाकीची तोडफोड करून पळ काढला. याची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.