सांगली : तिहेरी अपघातात युवक ठार

भाटशिरगाव येथे दोन मोटारसायकल व टँकर यांच्या अपघात
Avadhut patil
Avadhut patilsakal

शिराळा - भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे दोन मोटारसायकल व टँकर या तिहेरी अपघातात एक युवक ठार, तर दोन जण जखमी झाले. अवधूत रामदास पाटील (वय १९, रा. कणदूर) हा युवक ठार, तर सूरज नामदेव पाटील (२९, रा. कणदूर), विराज सुखदेव गोळे (रा. कांदे) हे दोघे जखमी आहेत. सदर अपघात सोमवार रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान झाला.

याबाबत जखमी सूरज पाटील याने शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. पोलिसातून समजलेली माहिती अशी की, सूरज पाटील हा आपल्या मोटारसायकलवरून सागाव येथे पेट्रोल टाकण्यासाठी निघाला होता. दरम्यान अवधुत पाटील हा भेटला . त्यावेळी शिराळा येथे काम असल्याने जावूया म्हणून ते दोघे मोटारसायकलवरून शिराळकडे निघाले. भाटशिरगाव जवळ आले असता अवधूतच्या मोटारसायकलला समोरुन येणाऱ्या मोटारसायकलने जोराची धडक दिली, त्यावेळी सुरज हा रस्त्याच्या एका बाजुस पडला व अवधूत मोटर सायकलसह रस्ताच्या दुसऱ्या बाजुस पडला. त्याचवेळी पाठीमागुन येणाऱ्या टँकरच्या समोर अवधूत आला. त्यास मोटर सायकलसह टँकरने पुढे फरफटत नेले. त्या धडकेत अवधुतच्या पायाला व छातीला मार लागला. त्यास तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसरा मोटारसायकल चालक विराज सुखदेव गोळे यास सांगलीला उपचारासाठी नेले आहे. सूरज पाटील याच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार भेट दिली. पुढील तपास हवालदार कालिदास गावडे हे करीत आहेत.

आईचा आक्रोश

अवधूत हा सरूड ता. शाहुवाडी येथे एफ,वाय बी.कॉम.ला होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील व लहान बहीण आहे. एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईचा उपजिल्हा रुग्णालयात सुरू असणारा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आई आशा स्वयंसेविका असल्याने रुग्णालयात परिसरातील आशा स्वयंसेविकांनी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com