
Sangli Killing Case : कुपवाड शहरातील बजरंगनगर येथे तरुणाचा धारदार हत्याराने वार करत खून निर्घृण खून करण्यात आला. उमेश मच्छिंद्र पाटील (वय २०, रा. कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली. शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या खुनाच्या घटनेमुळे शहर हादरले.