Malgaon : मालगावमध्ये किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल

Sangli Crime : सचिन हा बोलत थांबला असताना फिर्यादी आनंदा हे घरी जाऊया, असे बोलत असताना संशयित सोहेल तिथे आला. जखमी सचिन याने सोहेलकडे खाण्यासाठी मावा मागितला. यावरून त्यांच्यात वाद झाला.
The site in Malgaon where a youth was stabbed following a petty dispute; police investigation ongoing.
The site in Malgaon where a youth was stabbed following a petty dispute; police investigation ongoing.Sakal
Updated on

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे मावा खाण्यास देण्यावरून झालेल्या वादावादीतून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. सचिन वसंत पाटील असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी सचिनचा मित्र आनंदा काडाप्पा बरगाले (शास्त्रीनगर, मालगाव) यांनी सोहेल शाहिद मुजावर (मालगाव) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com