esakal | जिल्हा परिषदेची इस्रो' सहल रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

isro trip cancel

या सहलीच्या नियोजित तारखा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच शिक्षण समितीचे सदस्य यांच्याशी विचारविनिमयानंतर निश्‍चित करण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेची इस्रो' सहल रद्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना विषाणूची लागण देशातील व राज्यातील काही भागांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या विषाणूची लागण रोखण्यासाठी देशासह राज्यात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या इस्रो सहलीला स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीच्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळे आदी ठिकाणांवरून झपाट्याने होत आहे. या विषाणूमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहावे आणि जीवितहानी टाळण्याबाबत चर्चेसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

तीत इस्रो सहल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सहलीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील 42 विद्यार्थी व आठ अधिकारी व कर्मचारी यांची आणि समग्र शिक्षाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी राज्याबाहेरील हैदराबाद येथे आयोजित केली जाणारी जिल्ह्यातील 100 विद्यार्थी व 10 शिक्षक यांची शैक्षणिक सहल रद्द करण्यात आली आहे.

या सहलीच्या नियोजित तारखा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच शिक्षण समितीचे सदस्य यांच्याशी विचारविनिमयानंतर निश्‍चित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या अगोदरही इस्रो सहली गेल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी जिल्हा परिषद कर्मचारी वगळता त्यात इतरांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी सहलीमध्ये बाहेरील व्यक्तींचा समावेश करू नये, अशी मागणी शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

loading image