esakal | इस्लामपुरात पुन्हा तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

zoom meeting  taken in the meeting  office bearers and administration chairmanship of Sub Divisional Officer Nagesh Patil in islampur

उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंग झाली.

इस्लामपुरात पुन्हा तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहर २३, २४ व २५ ऑगस्ट रोजी तीन दिवस पूर्ण बंद करण्याचा निर्णय आज येथे पदाधिकारी व प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंग झाली.


तीन-चार दिवसात शहरात कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत चालली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील जनता कर्फ्युचे पालन करावे, अशा सूचना केल्याने आज नगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने ऑनलाइन बैठक घेत शहर तीन दिवस बंदचा निर्णय घेतला. 

हेही वाचा- डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आजारांनी सांगलीकरांना ताप -


उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, चेतन शिंदे, कोमल बनसोडे, मंगल शिंगण आदी बैठकीत सहभागी झाले. प्रांताधिकारी श्री. पाटील म्हणाले,‘‘वाढता संसर्ग विचारात घेऊन बंदचा निर्णय घेतला. मेडिकल, दुधविक्री वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लोकांनी बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल. बंद टप्प्याटप्प्याने केला जाईल. घरगुती उत्सव विचारात घेऊन पुढचा निर्णय जाहीर करू. नागरिकांनी सहकार्य करावे.’’

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top