
बेळगाव (कर्नाटक) : धारवाडचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी (Dharwad Congress leader Vinay Kulkarni) यांची आज (ता. २१) हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाततून (Hindalga Jail Belgaum) जामिनावर मुक्तता झाली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारागृहासमोर जल्लोष करून शक्तिप्रदर्शन केले. आज वीकेंड लॉकडाउन (Weekend Lockdown Karnataka) असतानाही हिंडलगा कारागृह परिसरात मात्र लॉकडाउनचे नियम धुळीस मिळवण्यात आले.
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून माजी मंत्री कुलकर्णी यांना अटक झाली होती.
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगीश गौडा (ZP Member Yogish Gowda Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून माजी मंत्री श्री. कुलकर्णी यांना अटक झाली होती. मागील नऊ महिन्यांपासून ते हिंडलगा कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळेच काल त्यांची सुटका होईल म्हणून कार्यकर्ते जमले होते. पण, मोहरमची सार्वजनिक सुट्टी असल्याने कारागृह प्रशासनास आदेश मिळाला नाही. त्यामुळे एक दिवस उशिराने आज त्यांना कारागृहातून सोडण्यात आले.
न्यायालयाने दिलेला जामीन आदेश कुलकर्णी यांच्या वकिलाने स्पीड पोस्टद्वारे काराग्रह प्रशासनास पाठविला होता. त्यानुसार आज कारागृह प्रशासनाने सकाळीच त्यांची मुक्तता केली. कुलकर्णी हे कारागृहाबाहेर पडताच, त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धारवाड आणि नवलगुंद येथील त्यांच्या समर्थकांनी आज हिंडलगा कारागृहात शक्तिप्रदर्शन केले. सकाळपासूनच सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते काराग्रहासमोर थांबून होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने देखील थांबविण्यात आली होती. बेळगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे येथील राणी चन्नम्मा चौकात स्वागत केले जाणार होते. पण, वीकेंड लॉकडाउनमुळे हा कार्यक्रम रद्द झाला. कारागृहातून बाहेर पडताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. कुलकर्णी यांनी, आपण या प्रकरणातून निर्दोष सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच यापुढे आपण वेगळ्या प्रकारचे राजकारण खेळणार असल्याचेही जाहीर केले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी बांधली 'राखी'
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (MLA Lakshmi Hebbalkar) या श्री. कुलकर्णी यांच्या स्वागतासाठी कारागृहासमोर थांबल्या होत्या. त्यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यावेळी आमदार हेब्बाळकर यांनी हिंडलगा कारागृहसमोरच श्री. कुलकर्णी यांना भाऊ म्हणून आरती ओवाळून राखी बांधली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.