सांगली : सत्ता असो वा नसो; लागेल तेवढा निधी ; डॉ. विश्वजित कदम

वसंतनगर-दुधोंडी येथे विकासकामांचे उद्‍घाटन
आमदार डॉ. विश्वजित कदम
आमदार डॉ. विश्वजित कदम sakal
Updated on

दुधोंडी : दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्याने मोठी पोकळी तयार झाली आहे. मात्र जनता त्यांना देत होती, तेवढेच प्रेम माझ्यावर करीत आहे. साहेबांनी विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मीही त्याचेच अनुकरण करीत आहे. इथून पुढेही सत्ता असो वा नसो, विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊन विकासाची गंगा घरोघरी पोहोचवणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

वसंतनगर (दुधोंडी) येथे विविध विकासकामांच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, शिवभवानी उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्‍घाटन झाले.

आमदार डॉ. कदम म्हणाले, ‘‘जे. के. जाधव व डॉ. कदम साहेब यांनी एकत्रित परिसराचा विकास केला. बापूंनी सांगेल ते काम साहेबांनी पूर्ण केले. उर्वरित कामे पूर्ण करण्याचे वचन देतो. सरपंच विजय आरबुने यांनी सांगितलेले हनुमान मंदिराचे काम तुम्ही मुहूर्त ठरवा उद्‌घाटनादिवशी मी कोणत्याही योजनेतून निधी घेऊन हजर असेन.’’

छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या सहायक शिक्षिका विजया जाधव यांनी स्वागत केले. सरपंच विजय आरबुने यांनी प्रास्ताविक केले. गावात केलेल्या सुविधांबद्दल माहिती सांगितली. ग्रामदैवत हनुमान मंदिराबाबत विश्वजित कदम यांच्याकडे तब्बल ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. जाधव, शिवभवानी उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव, युवक काँग्रेसचे डॉ. सुशील कुमार गोतपागर, प्रमोद जाधव, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, सुनील नलवडे, संपत पाटील, मीनाक्षीदेवी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतिकुमार जाधव, अभियंता मिलिंद जाधव, संदीप पाटील, कैलास शिंदे, नंदीवाले समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, सचिन पाटोळे, नंदू कदम, अनिल विभुते, शरद उगले, पांडुरंग नलावडे व ग्रामपंचायत सदस्य युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India sugar price hike due to production decline
BSNL network problem in Sangli villages
Solapur crime
Warana Dam gates opened
Marathi News Esakal
www.esakal.com