esakal | चिंचवड पोलिस ठाण्यातच तक्रारदार महिलेला मारहाण; पोलिसांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की 
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested for beating Complainant in Chinchwad police station

मेश्राम याने एका महिलेच्या मोबाईल नंबरवर अश्‍लील मेसेज पाठविण्यासह दूरध्वनीवरून त्या महिलेशी अश्‍लील भाषेत बोलला. तसेच चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलावर त्या महिलेशी अश्‍लील वर्तन केले.

चिंचवड पोलिस ठाण्यातच तक्रारदार महिलेला मारहाण; पोलिसांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला पोलिस ठाण्यातच मारहाण करण्यात आली. त्यानंतर महिलेला सोडविण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करीत पोलिस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या महिलेसह दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार चिंचवड पोलिस ठाण्यात घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौम्या लालबिहारी यादव (वय 21, रा. दिगोरी, उमरेड रोड, नागपूर), सुशांतकुमार मेश्राम (रा. सक्करदारा, नागपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेश्राम याने एका महिलेच्या मोबाईल नंबरवर अश्‍लील मेसेज पाठविण्यासह दूरध्वनीवरून त्या महिलेशी अश्‍लील भाषेत बोलला. तसेच चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलावर त्या महिलेशी अश्‍लील वर्तन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

याबाबतची तक्रार देण्यासाठी पीडित महिला सोमवारी (ता.19) सायंकाळी चिंचवड पोलिस ठाण्यात आली होती. त्यावेळी मेश्राम याच्यासह त्याची मैत्रीण सौम्या ही देखील पोलिस ठाण्यात आली. सौम्या हिने तक्रारदाराला मारहाण केली. दरम्यान, तेथील महिला पोलिस कर्मचारी पीडित महिलेला सोडविण्यासाठी गेल्या असता सौम्या हिने तीन महिला पोलिसांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. तर सुशांतकुमार याने ठाण्यातील सर्व पोलिसांना शिवीगाळ करीत पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. दरम्यान, बळाचा वापर करीत पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.