Innofest 2021 : स्टार्टअपना मिळणार सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी

Hackathon competition organized by Pune University and Pimpri-Chinchwad Municipal Corporation
Hackathon competition organized by Pune University and Pimpri-Chinchwad Municipal Corporation

पुणे :  ई कचऱ्याचे संकलन व त्याची विल्हेवाट लावणे, हवेचे प्रदूषण असा अनेक सामाजिक प्रश्नांवर अद्ययावत उत्तरे शोधण्याची संधी स्टार्टअप, विद्यार्थ्यासह सामान्य नागरिकांनाही मिळणार आहे. त्यासाठी ‘इनोफेस्ट २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस’ (सीआयआयई) विभाग आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या फेस्ट आयोजित करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेस्टमध्ये सहभागी होणारऱ्यासाठी किर्लोस्कर ग्रुपच्या 'क्लाऊड क्यू' कंपनीने देखील काही समस्या सुचविल्या आहेत. ज्या स्पर्धकांना सोडवायच्या आहेत. इनोफेस्ट अंतर्गत हॅकेथॉन, आय टू ई कॉमपिटीशन, पिच फेस्ट, फायनल टू डे समिट या स्पर्धा असतील. स्पर्धेतील विजेत्यांसाठी या तिन्ही संस्थांकडून जवळपास साडेबारा लाखाची बक्षीसे ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सीआयाईच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक किरण वैद्य, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण आदी यावेळी उपस्थित होते. स्पर्धा व्हर्चुअल स्वरूपात होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी info.iil@unipune.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. स्पर्धेबाबतची अधिक माहिती iil.unipune.ac.in वर मिळेल.



संकल्पनेचे होणार स्टार्टअपमध्ये रूपांतर :
चांगल्या कल्पनांना इनोफेस्टच्या माध्यमातून उद्योग जगताशी जोडून समाजोपयोगी प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षीच्या 'इनोवेशन टू एंटरप्रायझेस' या स्पर्धेतून स्टार्टअपच्या सुमारे दोन हजार कल्पना आल्या होत्या. त्यातील २२ आयडियांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर झाले आहे. सहभागी स्पर्धकांतून निवड झालेल्यांची पुढे ९ गटांमध्ये स्पर्धा घेतली जाईल व त्यातून २४ चांगल्या कल्पनांना 'बूट कॅम्प' च्या माध्यमातून तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील व त्याचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्नही केला जाईल, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.

  •  हॅकेथॉनची नोंदणी ३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणार
  •  स्पर्धेत दोन ते चार जणांची एक टीम असेल
  •  दिलेल्या समस्ये वरील उपाय लिखित व व्हिडिओ स्वरूपातील असावे
  • विजेत्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाच लाख
  • ‘क्लाऊड क्यू' कपंनीकडून पाच आणि विद्यापीठाकडून अडीच लाखांची बक्षीसे देणार
  •  स्पर्धेचे परीक्षण उद्योग जगातील तज्‍ज्ञ व्यक्ती करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com