पिंपरी महापालिका पोटनिवडणूक; राज्य निवडणूक आयोगाचे तयारीचे आदेश

pimpri cinchwad municipal corporation
pimpri cinchwad municipal corporation

पिंपरी - महापालिकेतील तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 

याबाबत अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन 12 मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. दत्ता साने (चिखली), जावेद शेख (काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी), लक्ष्मण उंडे (दिघी-बोपखेल) या नगरसेवकांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या जागा रिक्त असून पोटनिवडणूक होणार आहे.

भाजप नगरसेविकेच्या पतीवर चोरी प्रकरणी गुन्हा

अशा प्रसिद्ध होतील मतदार याद्या 

-केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2021 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन. 
-प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 16 फेब्रुवारीला प्रसिद्ध 
-हरकती व सूचना 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत 
-प्रभानिहाय अंतिम मतदार यादी 3 मार्च 
-मतदान केंद्राची यादी 8 मार्चला प्रसिद्ध 
- अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 12 मार्चला अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध 

पुण्यात डेटींग अॅपवरून ओळख;आईची औषधे वापरून 16 तरुणांना लुटले

निवडणूक बिनविरोध होणार? 
कोरोनामुळे राष्ट्रवादीचे दत्ता साने, जावेद शेख आणि भाजपचे लक्ष्मण उंडे या तीन नगरसेवकांचे निधन झाले आहे. पोटनिवडणुकीत सहानभुतीची लाट असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देवून बिनविरोध निवडून आणण्याचा विचार होवू शकतो. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. काटावरचे बहुमत नाही. मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे केवळ सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यासाठी पोट निवडणूक बिनविरोध होवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com