
पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर, सृष्टी चौक येथे शनिवारी (ता.12) दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून भटक्या कुत्र्याला खाली फेकले. या घटनेत पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकीरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाचा हा कुत्रा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पिंपरी : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथे घडली. या घटनेची खासदार व प्राणीप्रेमी मनेका गांधी यांनी थेट सांगवी पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेत आरोपींवर कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. मनेका गांधी यांच्या फोननंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगात तपास सुरू केला आहे. यातील संशयित निष्पन्न झाले असून चौकशीनंतर लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांना सांगितले.
पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर, सृष्टी चौक येथे शनिवारी (ता.12) दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून भटक्या कुत्र्याला खाली फेकले. या घटनेत पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकीरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाचा हा कुत्रा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याप्रकरणी फरीनजहॉं विसाल शेख (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिल्यानंतर याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भारतीय दंड विधान कलम 429 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती प्राणीप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी फिर्यादी फरीनजहॉं शेख यांच्याशी संपर्क साधला. तसेच मनेका गांधी यांच्याशी ई-मेल द्वारे संपर्क केला. काही वेळातच मनेका गांधी यांनी दिल्लीहून फोन केला. घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासह पोलिसांशी बोलणे करून देण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी खासदार मनेका गांधी व सांगवीचे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांचा संपर्क करून दिला.
दरम्यान, खासदार मनेका गांधी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत तपास लवकरात लवकर करावा. तसेच यातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी सूचना पोलिसांना दिली.
Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत
आरोपींपर्यंत लवकरच पोहोचू
खासदार मनेका गांधी यांनी फोनवरून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व चौकशीवरून काही संशयितांची माहिती मिळाली आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू.
- अजय भोसले, निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे