
पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे व उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला.
पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केल्याने आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. या तपासात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) व उपनिरीक्षक या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे व उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनीही आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, निकाळजे व जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (ता. 22) रात्री याबाबतचे आदेश दिले.