लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला वाढली गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे कोविड-१९ पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रिसाॅर्टंस बंद होती. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायिकांवर सक्रांत आली, मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते.  त्यात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोणावळा : वीकेंडला पर्यटकांनी गर्दी केल्याने लोणावळा, खंडाळा फुल्ल झाला आहे. हौस, मौजमजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना शहरातील सर्व रिसॉर्टस, हाॅटेल्स, बंगल्यांमध्ये पर्यटकांचा बऱ्यापैकी राबता आहे. येथील लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, खंडाळा, पवना परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक पर्यटकांना मास्क चा  पडल्याने कोरोनाची भीती नाहीशी झाल्याचे चित्र आहे.

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे कोविड-१९ पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रिसाॅर्टंस बंद होती. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायिकांवर सक्रांत आली, मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते.  त्यात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बोरघाटात, राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट, तुंगार्ली धरण, नारायणी धाम,एकवीरा, कार्ला, भाजे लेणी, लोहगड,पवना परिसरात निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. गेले काही विकेंड पर्यटकांची लोणावळा, खंडाळ्यास पसंती मिळत असल्याने गर्दी झाली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, गुजरात येथील पर्यटकांचा अधिक भरणा आहे. सध्या हॉटेलांमध्ये साठ ते सत्तर टक्के बुकिंग असून पुढील आठवड्यात पर्यटकांची संख्या नक्की वाढेल अशी आशा हॉटेल व्यावसायिक आशिष खंडेलवाल यांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग टाळत सुरक्षित पर्यटनासाठी पर्यटकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले.

महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा
पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर चांगलाच ताण आला होता. पुणे-मुंबई महामार्गावर अपोलो गॅरेज, महावीर चौक, पेट्रोल पंपादरम्यान वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. द्रुतगती मार्गावर बोरघाटात पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourists crowd at Lonavala on weekends