पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1004 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) सहा जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील तीन व शहराबाहेरील तीन जणांचा समावेश आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) सहा जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील तीन व शहराबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील एकूण 926 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात आज एक हजार चार जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 55 हजार 234 झाली आहे. आज 963 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 46 हजार 401 झाली आहे. सध्या सात हजार 907 सक्रिय रुग्ण आहेत. आज मयत झालेल्या व्यक्ती चिंचवड (पुरुष वय 79), भोसरी (स्त्री वय 69), चाकण (स्त्री वय 55), दिपोडी (पुरुष वय 70), नगर (पुरुष वय 84), बंगाल (पुरुष वय 84) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात दाखल बाहेरील रुग्ण संख्या 922 आहे. आज दाखल झालेल्या 37 जणांचा त्यात समावेश आहे. आजपर्यंत शहराबाहेरील 221 जणांचा समावेश आहे. आज तीन जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहराबाहेरील दोन हजार 219 जण बरे झाले आहेत. पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1004 new corona patients found in pimpri chinchwad