लोणावळा : मधमाश्यांच्या हल्यात ११ पर्यटक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bee attack

लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्याजवळील कातळधार धबधबा परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरा पर्यटक गंभीर जखमी झाले आहे.

लोणावळा : मधमाश्यांच्या हल्यात ११ पर्यटक जखमी

लोणावळा - लोणावळ्याजवळील (Lonavala) राजमाची किल्ल्याजवळील कातळधार धबधबा परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यात (Bee Attack) पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरा पर्यटक (Tourist) गंभीर जखमी (Injured) झाले आहे. रविवारी (ता.२७) दुपारी ही घटना घडली.  येथील शिवदूर्ग मित्रच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या पर्यटकांची सुटका केली. या सर्वांना लोणावळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शंतनू देवळेकर, शारदा पवार, युवराज सिंग, संपदा पोकळे, खुशबू लोंढे, कमलेश इंगळे, ऋत्विक चव्हाण, वैभव इनामदार, निलेश वांद्रे, प्रशांत शृंगारे, अभिजित आहिरे अशी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रावेत, भोसरी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंते तरुण-तरुणी रविवार असल्याने लोणावळ्याजवळील राजमाची, कातळधार धबधबा परिसरात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटनासाठी आले होते.

अचानक कड्यावरील आग्यामोहोळ अचानक उठले. यावेळी मधमाश्यांनी पर्यटकांवर जोरदार हल्ला चढविला. यामध्ये अकरा पर्यटक जखमी झाले. पर्यटकांपैकी काहींनी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षकचे अशोक मते, महेश मसणे, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, निलेश गराडे, गणेश निसाळ, शुभम काकडे, जिगर सोळंकी, आदित्य पिलाणे, आयूष वर्तक, हर्ष तोंडे, सिद्धेश निसाळ, अमोल सुतार, कपिल दळवी, मनोज वरे यांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटकांची सुटका केली. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 11 Tourist Injured In Bee Attack In Lonavala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Touristlonavala
go to top