
सध्या महापालिका रुग्णालयांत 674 रुग्ण उपचार घेत आहेत. 837 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 462 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील 1 हजार 740 जणांची तपासणी केली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 110 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 98 हजार 738 झाली आहे. आज 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 412 झाली आहे. सध्या एक हजार 541 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील व बाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.
सध्या महापालिका रुग्णालयांत 674 रुग्ण उपचार घेत आहेत. 837 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 462 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील 1 हजार 740 जणांची तपासणी केली. 850 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 1 लाख 222 जणांचे विलगीकरण करण्यात आले.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आजपर्यंत शहरातील एक हजार 785 आणि शहराबाहेरील 745 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दोन हजार 81 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 660 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दोन हजार 442 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत पाच लाख 89 हजार 483 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 88 हजार 303 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 85 हजार 645 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.