coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 113 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

आज शहरातील एक व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 816 आणि बाहेरील 763 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 428 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत सात हजार 479 जणांना लस देण्यात आली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 113 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 641 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 795 झाली आहे. सध्या दोन हजार 30 सक्रिय रुग्ण आहेत. 

आज शहरातील एक व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 816 आणि बाहेरील 763 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 428 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत सात हजार 479 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 628 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 402 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कंटेन्मेंट झोनमधील 206 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील 968 जणांची तपासणी केली. 905 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 16 हजार 31 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

आज एक हजार 705 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 566 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 425 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 674 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजपर्यंत सहा लाख 23 हजार 44 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 21 हजार 978 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 18 हजार 712 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चऱ्होली (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक महिला मरकळ (वय 72) व खालापूर (वय 69) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 113 new coroana patients in Pimpri-Chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: