esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1158 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1158 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहरात आज 857 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1158 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 857 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 43 हजार 374 झाली आहे. आज एक हजार 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 733 झाली आहे. आज शहरातील 20 व शहराबाहेरील तीन, अशा 23 जणांचा मृत्यू झाला. त्यात 15 पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 825 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 12 हजार 816 रुग्ण सक्रिय आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना मिळणार उद्यापासून 'जम्बो फॅसिलिटी' 

आज मृत झालेल्या व्यक्ती चिंचवड (पुरुष वय 59, वय 69, वय 68), रहाटणी (पुरुष वय 43, स्त्री वय 94), सांगवी (पुरुष 75, स्त्री वय 65), वाल्हेकरवाडी (पुरुष वय 75), चिखली (पुरुष वय 62 व वय 48), किवळे (पुरुष वय 68), निगडी (स्त्री वय 50, पुरुष वय 70), मोशी (पुरुष वय 65), काळेवाडी (स्त्री वय 60, स्त्री वय 60, पुरुष वय 48), भोसरी (पुरुष वय 48), पिंपळे सौदागर (पुरुष वय 55), चऱ्होली (स्त्री वय 83), देहूगाव (पुरुष वय 49), देहूरोड (स्त्री वय 65), मंचर (स्त्री वय 55). 

loading image
go to top