पिंपरी-चिंचवडमध्ये 1240 नवे रुग्ण; 10 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 240 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 58 हजार 747 झाली आहे. आज 502 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 48 हजार 94 रुग्ण बरे झाले आहेत. आज 10 जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 240 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 58 हजार 747 झाली आहे. आज 502 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 48 हजार 94 रुग्ण बरे झाले आहेत. आज 10 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील सात व शहराबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. एकूण मृत्यू संख्या 966 झाली आहे. सध्या नऊ हजार 687 जण सक्रिय आहेत. 

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

आज मृत्यू झालेले पुरुष चिखली (वय 54), काळेवाडी (वय 73), भोसरी (वय 57), थेरगाव (वय 68), खेड (वय 68 व 69), भवानी पेठ पुणे (वय 39) येथील रहिवाशी आहेत. तर आज मृत्यू झालेल्या महिला भोसरी (वय 70), चिंचवड (वय 78), वाल्हेकरवाडी (वय 49) येथील रहिवाशी आहेत. 

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

पुण्यातील रुग्णालयांत शहरातील 285 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, शहराबाहेरील 901 रुग्ण शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील 239 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार 311 जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. घरामध्ये 47 हजार 367 जणांना आयसोलेट केले आहे. आजपर्यंत दोन लाख 43 हजार 623 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी दोन लाख 39 हजार 312 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1240 new corona patients in Pimpri-Chinchwad