पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1258 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 258 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज एक हजार 258 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 56 हजार 493 झाली आहे. आज 676 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 47 हजार 77 रुग्ण बरे झाले आहेत. आज 24 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 17 व शहराबाहेरील सात जणांचा समावेश आहे. एकूण मृत्यू संख्या 943 झाली आहे. सध्या नऊ हजार 416 जण सक्रिय आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये 17 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. आज तीन हजार 94 संशयित रुग्ण दाखल झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले पुरुष संभाजीनगर (वय 73), निगडी (वय 68), दिघी (वय 83), पिंपळे निलख (वय 59), आकुर्डी (वय 69), थेरगाव (वय 65 व 54), संत तुकारामनगर पिंपरी (वय 61), शाहूनगर (वय 79), मासुळकर कॉलनी (वय 86), सांगवी (वय 32), इंद्रायणीनगर भोसरी (वय 72), चिंबळी (वय 85), देहूगाव (वय 65), मावळ (वय 60), पुणे (वय 65), खेड (वय 57) येथील रहिवाशी आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

आज मृत्यू झालेल्या महिला भोसरी (वय 62), निगडी (वय 85), थेरगाव (वय 66), खराळवाडी (वय 74), चिंचवड (वय 72), देहूरोड (वय 65), शिरूर (वय 76) येथील रहिवाशी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1258 new corona positive in pimpri chinchwad on monday 7 august 2020