पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी मिळणार कोव्हिशिल्डचे १३,१०० डोस

पिंपरी चिंचवड महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे १३ हजार १०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (ता. ३०) ५० केंद्रांवर केली आहे.
Covishield
CovishieldSakal

पिंपरी - महापालिकेकडे (Municipal) कोव्हिशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) १३ हजार १०० डोस (Doses) उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (Friday) (ता. ३०) ५० केंद्रांवर केली आहे. मात्र, कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचे केवळ ४०० डोस उपलब्ध झाले असून, ते देण्याची व्यवस्था केवळ दोन केंद्रांवर केली आहे. गरोदर महिलांना आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. (13100 Doses of Covishield Available in Pimpri Chinchwad on Friday)

कोव्हॅक्सिन लस सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी केंद्रावर ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना आणि शिवतेजनगर येथील स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दिली जाणार आहे. दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी १०० डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेले असावेत. ऑनलाइन व टोकन पद्धतीनुसार नोंदणी केली जाईल.

Covishield
पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

कोव्हिशिल्डचे नियोजन

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना आठ केंद्रांवर पहिला व दुसरा डोस दिला जाईल. प्रत्येक केंद्रावर ३०० डोस उपलब्ध असून, प्रत्येकी १५० डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी आहेत. मात्र, १९ केंद्रांवर केवळ पहिला डोसच दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ २०० डोस उपलब्ध असतील. ४५ वर्षांवरील नागरिकांना २३ केंद्रांवर पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रांवर ३०० डोस उपलब्ध असून, १०० डोस पहिला व २०० डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी असतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे.

गरोदर महिलांसाठी केंद्रावरच नोंदणी

गरोदर महिलांसाठी सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर दवाखाना, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा हॉस्पिटल चिंचवड या केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी काही डोस राखीव ठेवले असून केंद्रावरच नोंदणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com