
सध्या महापालिका रुग्णालयांत 700 रुग्ण उपचार घेत आहेत. 968 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 869 घरांना काल स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. 701 जणांचे विलगीकरण करण्यात आले.
पिंपरी - शहरात बुधवारी (ता. 23) 139 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 95 हजार 702 झाली. काल 210 जणांना डिस्चार्ज मिळाला. कालपर्यंत 92 हजार 293 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार 668 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील चार व बाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. कालपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 741 झाली आहे. तर, शहराबाहेरील 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 700 रुग्ण उपचार घेत आहेत. 968 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 869 घरांना काल स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. 701 जणांचे विलगीकरण करण्यात आले.
थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची लोणावळ्याला पसंती
'कोविड प्रतिबंधक लससाठी नोंदणी करा'
कोविड प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात सरकारी, महापालिका व खासगी आरोग्य व वैद्यकीय संस्थांमधील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. महापालिका व खासगी दवाखाने, रुग्णालये, सर्व वैद्यकीय, नर्सेस व औषध निर्मिती संघटनांशी संबंधितांनी महापालिकेच्या "स्मार्ट सारथी ऍप'वर दोन दिवसांत नावनोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.