esakal | भाजपचे १५ नगरसेवक संपर्कात : राष्ट्रवादी

बोलून बातमी शोधा

NCP-Logo}

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी डावलल्याने सत्ताधारी भाजपचे रवी लांडगे यांनी तडकाफडकी सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.

pimpri-chinchwad
भाजपचे १५ नगरसेवक संपर्कात : राष्ट्रवादी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी डावलल्याने सत्ताधारी भाजपचे रवी लांडगे यांनी तडकाफडकी सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. भाजपचे आणखी एक सदस्य राजीनामा द्यायच्या तयारीत असून, त्यांचे पंधरा नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला. 

स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वाघेरे व मिसाळ पत्रकारांशी बोलत होते. लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा एक सदस्य कमी झाला. त्यांचाच आणखी एक सदस्य राजीनामा द्यायच्या तयारीत आहे. त्यामुळे १६ सदस्यांच्या समितीत भाजपचे दहापैकी आठ सदस्य राहतील. उर्वरित १४ सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. मित्रपक्ष शिवसेनेचा एक सदस्यही आमच्या बाजूनेच आहे. अपक्ष सदस्यही आमचाच समर्थक आहे. आमच्याकडे सहा सदस्य आहेत. बहुमतासाठी आठ सदस्यांची आवश्‍यकता आहे. म्हणजेच आम्हाला दोन मतांची आवश्‍यकता आहे. भाजपमधील नाराज आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी माघार
राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी यापूर्वीही उमेदवार उभे केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती. आताही ते माघार घेतात, की निवडणूक लढविणार, हे शुक्रवारीच स्पष्ट होईल. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे व महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले, ‘‘त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे माघार घेणार नाही. निवडणूक लढविणार आहे.’

Edited By - Prashant Patil